बॉलीवूडमधील दिग्गज अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) 2020 हे वर्ष फलदायी ठरत असल्याचे दिसून येत आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच त्याच्या “तानाजी’ (Tanhaji: The Unsung Warrior) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धम्माल केली होती. तसेच “जवानी जानेमन’ चित्रपटानेही चांगला गल्ला जमविला होता. याशिवाय त्याच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.
सैफ अली खान (Saif Ali Khan) हा लवकरच मोठ्या पडद्यावर “बाहुबली’ फेम प्रभास (Prabhas) याला टक्कर देणार आहे. हे दोघेजण “आदिपुरुष’ (adipurush) मध्ये एकत्रित झळकणार आहे. या चित्रपटात प्रभास हा मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे, तर दुसरीकडे सैफ अली खान (Saif Ali Khan) हा एका खुंखार खलनायकच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत (Om Raut) हे करत आहेत.
हा चित्रपट 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होणार असल्याचेही प्रभासने (Prabhas) म्हटले आहे. या चित्रपटाची कथा रामायणाच्या कथेवर आधारलेली आहे. त्यामध्ये प्रभास आदिपुरुषाच्या रोलमध्ये तर सैफ अली खान (Saif Ali Khan) लंकेशच्या रोलमध्ये दिसणार आहे. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच अडचणीत सापडला आहे. रावण अर्थात लंकेश या भूमिकेबाबत बोलताना सैफ अली खानने (Saif Ali Khan) केलेलं वक्तव्य त्याला अडचणीत आणण्याची शक्यता आहे.
भाजप आमदार आणि प्रवक्ते राम कदम (Ram Kadam) यांनी सैफ अली खानवर (Saif Ali Khan) जोरदार टिका केली आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘आदिपुरुष (adipurush) नावाच्या चित्रपटात सैफ रावणाची भूमिका साकारत आहेत. यामध्ये सैफ अली खान म्हणत आहेत की ते रावणाच्या भूमिकेला हिरोप्रमाणे प्रस्तुत करतील. ते म्हणत आहेत की, लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापल्याने त्या बदल्याच्या भावनेतून रावणाने माँ सीतेचं हरण केलं, प्रभू रामचंद्रांबरोबर युद्ध केलं. या घटनेला ते न्याय देणार आहेत. सैफ अली खान याचं समर्थन करत असतील, तर याचं समर्थन कसं होईल?’ असा सवाल करत राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
अभिनेता #सैफअलीखान आदिपुरुष नाम की फ़िल्म में रावण की भूमिका निभाने वाले है । सैफ अली खान , रावण के रोल को हीरो की तरह पेश करेंने की बात करते है रावण के दुष्कृत्य को कृत्य को फ़िल्म के जरिए न्याय देंगे ?यह कैसे संभव है ?
— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) December 6, 2020
काय म्हणाला सैफ?
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सैफ अली खानने (Saif Ali Khan) ‘आदिपुरुष’ (adipurush) मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना म्हटले की, ‘या चित्रपटात लंकेशची व्यक्तिरेखा वाईट नसून मनोरंजक आहे. एक अशा राक्षस राजाची भूमिका वठवणं रंजक आहे. यामध्ये सीताचं अपहरणाच्या औचित्यातून रावणाची रामासोबत लढाई सूड उगविण्यात दाखवली जाईल, जी लक्ष्मणाने रावणाची बहिण शुर्पणखाचं नाक कापल्यामुळे सुरू झाली होती.