मुंबई- बॉलिवूड अभिनेता ‘सुशांत सिंह राजपूत’ याने 14 जून रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येनंतर चित्रपटसृष्टीतील वातावरण चांगलेच तापले असून येथील घराणेशाही आणि कंपूशाहीविरूध्द बातम्यांनी सोशल मीडिया ढवळून निघाला.
दरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर हजारो छोटे-मोठे बदल घडून आले. 14 जून (रविवार) नंतर 15 जूनपासून ‘घराणेशाही’ हा शब्द सर्च करण्यामध्ये जवळपास 2 हजार टक्क्यांनी वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.
‘SEMrush’ (एसइएमरश) यांच्या सर्वेक्षणातून, मे 2019 ते जून 2020 या कालावधीत नेपोटिझ्म म्हणजेच घराणेशाही हा शब्द सोशल मीडियावर सर्वाधिक वेळा सर्च केली माहिती समोर आली आहे. या काळात जवळपास 62 हजार 458 वेळा हा शब्द सर्च झाला. विशेष म्हणजे सुशांतच्या आत्महत्येनंतर या शब्दाच्या सर्चमध्ये मोठी भर पडली.
तसेच, नेपोटिझ्म या शब्दा बरोबर #NepotismBollywood, #BollywoodBlockedSushant, #JusticeForSushantRajput आणि #KaranJoharssBULLY हे हॅशटॅग सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरण्यात आले आहेत, तसंच सर्चही झाले आहेत.