Huma Qureshi Marriage| बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचे जहीर इक्बालसोबत नुकताच विवाहसोहळा संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला बॉलीवूडचे दिग्गज कलाकार मंडळी उपस्थित राहिली होती. सोनाक्षीच्या लग्नानंतर आता बॉलीवूडची आणखी एक अभिनेत्री विवाह बंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्या अभिनेत्रीचे नाव आहे हुमा कुरेशी. सोनाक्षी सिन्हा आणि हेमा दोघीही जिवलग मैत्रिणी आहेत. सोनाक्षीच्या रिसेप्शन पार्टीला हेमा बॉयफ्रेंड रचित सिंहसोबत पोहचली होती.
यादरम्यानचे दोघांचे फोटो सोशल मिडियावर तुफान व्हायरलही झाले होते. सोनाक्षीच्या लग्नाच्या या फोटोंमध्ये रचित सिंहसोबत हुमा कुरेशीला बघितल्यानंतर चाहत्यांमध्ये त्यांच्या लव्हस्टोरीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र दोघांनीही त्यांच्या डेटिंगच्या बातम्यांवर मौन बाळगले आहे. यादरम्यान आता त्यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे.
कोण आहे रचित सिंह? Huma Qureshi Marriage|
रचित सिंह एक प्रसिद्ध ॲक्टिंग कोच अर्थात अभिनय प्रशिक्षक आणि अभिनेता आहे. आलिया भट्ट, रणवीर सिंह, वरुण धवन, विकी कौशल, अनुष्का शर्मा यांसारख्या अनेक कलाकारांसोबत त्याने ॲक्टिंग कोच म्हणून काम केले आहे. रवीना टंडनच्या ‘कर्मा कॉलिंग’ या वेब सीरिजमध्येही रचित सिंह झळकला आहे. यात त्याने वेदांतची भूमिका साकारली होती.
दरम्यान, हुमा कुरेशीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या उत्तम अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. उत्तम कामगिरीसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कांरासाठी नामांकनही मिळाले होते. दरम्यान, यापूर्वी देखील हुमा कुरेशीचे अनेकांसोबत नाव जोडले गेले होते. Huma Qureshi Marriage|
हेही वाचा :
…अन् श्रद्धा कपूरने फोनने तोडले ‘अक्रोड’