Salman Khan | बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा सिकंदर चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या सलमान दिग्दर्शक ए.आर. मुरुगदास यांच्यासोबत ‘सिकंदर’ या चित्रपटावर काम करत आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटानंतर सलमान कोणत्या चित्रपटात पाहायला मिळणार याची माहिती समोर आली आहे. सलमान लवकरच त्याच्या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल शूट करणार आहे. तो चित्रपट म्हणजे ‘किक 2’ हा आहे.
सलमानचा 2014मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किक’ चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाच्या यशानंतर चाहते या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आता चित्रपटाच्या शुटींगला लवकरच सुरुवात होण्याची शक्यता आहे. साजिद नाडियाडवालाने ‘किक’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
आता ‘किक 2’ मध्ये तो पुन्हा एकदा दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. निर्मात्यांनी या वर्षी जून ते ऑगस्ट दरम्यान किक 2 चे शूटिंग सुरू करण्याची योजना आखली आहे. तर जॅकलिन फर्नांडिस किक २ मध्येही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Salman Khan |
रिपोर्टनुसार, सलमान खानचा ‘किक २’ चित्रपट २०२६ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. ‘किक २’ चे शूटिंग सुरू होण्यापूर्वी ‘सिकंदर’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला आहे. Salman Khan |
हेही वाचा:
स्मिता पाटीलचा लेक प्रतीकने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; पण कुटुंबियांचा दिले नाही निमंत्रण