डॉक्टर बाधित : परिसर भयभीत
भवानीनगर (वार्ताहर)- येथील डॉक्टर करोना बाधित झाल्याने भवानीनगरसह संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. बाधित डॉक्टरांची प्रकृती स्थिर आहे.
(दि.28) सणसर येथे एकजण बाधित आढळल्याने सणसर, भवानीनगर परिसर पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. सात दिवस सणसर व भवानीनगर व्यापारपेठसह परिसर पूर्णपणे बंद ठेवला होता. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यांनी चर्चेतून भवानीनगर व्यापारपेठ सुरू करण्याचे सांगण्यात आले. ग्रामपंचायतीने व्यापारपेठ सुरू करण्याबाबत परवानगी दिली होती.
सोमवार (दि.3) सात दिवसानंतर पुन्हा भवानीनगर येथील व्यापारपेठ सकाळी नऊ वाजता सुरू झाली. तासाभरात डॉक्टर बाधीत असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती मिळाल्याने उघडलेली व्यापारपेठ पुन्हा कुलूपबंद करण्यात आली.