मुंबई – आपल्या दिलखेच अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे अभिनेत्री ‘सई ताम्हणकर’ मराठी रसिकांच्या दिलों की धडकन बनली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस आणि हॉट अभिनेत्री म्हणून सध्या ‘सई ताम्हणकर’कडे पाहिलं जातं.
View this post on Instagram
सई नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय हे सुद्धा सई तिच्या चाहत्यांना सांगत असते.
View this post on Instagram
नुकतंच सईने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटर काही हटके आणि हॉट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सईचा ग्लॅमर अंदाज दिसून येत आहे. सईने नुकतेच इंस्टाग्रामवर गुलाबी रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. गुलाबी रंगाच्या साडीत सई खूपच ग्लॅमरस दिसते आहे. सध्या तिच्या या फोटोवर फॅन्सकडून जोरदार लाईक्सचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे. तिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सईच्या अभिनयासाठी तिला आजवर अनेक पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे.