रुपाली चाकणकरांच्या इशाऱ्यानंतर प्रविण दरेकरांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले…

पुणे – विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलेल्या महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो असा इशारा दिला होता त्यावर दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

थोबाड सर्वांना रंगवता येतं त्यामुळे अशाप्रकराचे अतिरेकी भाषण करणे योग्य नाही. माझं नीट वक्तव्य समजून घेण्याची आवश्यकता आहे. वड्याचं तेल वांग्यावर काढायचं आणि प्रसार माध्यंमात काहीतरी पाहिजे म्हणून असं काही बोलेले की आपल्याला प्रसिध्दी मिळते. अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

प्रविण दरेकर म्हणाले की, मी काही त्यांना महत्व देत नाही, थोबाड सर्वांना रंगवता येतं त्यामुळे अशाप्रकराचे अतिरेकी भाषण करणे योग्य नाही. माझं नीट वक्तव्य समजून घेण्याची आवश्यकता आहे. मी असं सांगितलं की, भारतीय जनता पार्टी उपेक्षासांठी, गरिबांसाठी, कष्ठकऱ्यांसाठी, श्रमीकांसाठी काम करते. ते समाजातला शेवटचा जो घटक आहे. त्याला मदत त्याठिकाणी करत असतील. आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष धनदाडंग्यांसाठी, प्रस्तापितासांठी मोठ्यांसाठी काम करतो. आणि अशाप्रकारे रंगलेल्या गालाचे मुके घेण्याऱ्या प्रवृत्तीबद्दल मी बोललो होतो.

असा काही कुठल्या महिलेचा त्यामध्ये संबंध नाही. बोलायचा काही विषय पण नाही. कारण त्यामुळे वड्याचं तेल वांग्यावर काढायचं आणि प्रसार माध्यंमात काहीतरी पाहिजे मग असं काही बोलेले की आपल्याला प्रसिध्दी मिळते. असे काही लोकं आहेत. त्यांला मी फारसं महत्व देत नाही. अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी रुपाली चाकणकरांच्या इशाऱ्यानंतर दिली आहे.

दरम्यान, प्रविण दरेकर, महिलांची माफी मागा अन्यथा आम्हीही महिलांचा अपमान करणाऱ्यांचे थोबाड आणि गाल रंगवू शकतो. असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दरेकरांना दिला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.