मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाने आज वेगळेच वळण घेतले. मुंबई पोलीस या प्रकरणी हाट प्रोफाईल लोकांची चौकशी करत दिसून येत आहे . यातच अभिनेत्री अंकिता लोखंडेने या प्रकरणाविषयी नेहमीच सोशल मीडियावर आपले मत पोस्ट करत मांडले आहे . काही दिवसांपूर्वी प्रकरणात पोलिसांकडून अंकिता लोखंडेचीही चौकशी करण्यात आली होती.
— Ankita lokhande (@anky1912) September 9, 2020
दरम्यान तिने पुन्हा एकदा ट्विटरवर या संपूर्ण प्रकरणाविषयी आपले मत मांडले आहे. तिने म्हंटले आहे की,’“मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगते. मला प्रसारमाध्यमातून एकच प्रश्न विचारण्यात येत आहे की सुशांतची हत्या आहे की आत्महत्या? सुशांतची हत्या झाली असं मी कधीच म्हटलं नाहीये आणि कोणाला दोषीदेखील म्हटलेलं नाही. मी कायम माझ्या मित्रासाठी, त्याला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे. तसंच त्याच्या कुटुंबीयांची साथ देत आहे. त्यामुळे सत्य हे तपासयंत्रणांच्या माध्यमातून समोर यावं. मला महाराष्ट्र राज्य सरकार, पोलीस यंत्रणा आणि केंद्र सरकार यांच्यावर पूर्ण विश्वास आहे”, असं अंकिता म्हणाली.