नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा आणि अतिशी मर्लेना यांना अटक करण्यात आली.
रितू राज, कुलदीप कुमार आणि संजीव झा या आमदारांनाही ताब्यात घेण्यात आले. नवी दिल्ली महापालिकेच्या निधीचा गैरवापर केल्याच्या आरोप करत ही निदर्शने करणार असल्याचे आपने जाहीर केले होते.
Delhi: Police detain AAP leader Atishi Marlena from near residence of Delhi Lieutenant Governor Anil Baijal.
She was to hold a demonstration outside the residence of Lt Governor against alleged misappropriation of funds done by North Delhi Municipal Corporation. pic.twitter.com/YBKnBDIJvv
— ANI (@ANI) December 13, 2020
राघव चढ्ढा यांना निदर्शने करण्याची पोलिसांनी सुरवातीला परवानगी नाकारली होती. देशाच्या गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर गदर्सी जमा करता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यांना पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले होते.
करोनाच्या साथीमुळे 31 डिसेंबरपर्यंत कोणतीही राजकीय अथवा धार्मिक, सांसकृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.