पंतप्रधान मोदींपाठोपाठ शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली करोना लस

मुंबई – आजपासून देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. तिसऱ्या, टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करोनाची लस घेतली आहे. 60 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण या तिसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. मोदींपाठोपाठ राज्यातील नेत्यांनी लस घेण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुंबई येथील जेजे रुग्णालयात कोविशिल्ड लस घेतली. लस घेतल्यानंतर ते अर्धा तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली होते. त्यानंतर ते घरी रवाना झाले. राज्यात लस घेणारे शरद पवार पहिले राजकीय नेते आहेत. यावेळी जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता तात्याराव लहाने आणि कन्या सुप्रिया सुळे रुग्णालयात उपस्थित होत्या. लस घेतल्याची माहिती शरद पवार यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करून दिली.


खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील जेजे रुग्णालयात करोना लस घेतली. त्यांनी देखील लस घेत असतानाचा व्हिडिओ शेअर केला. रुग्णालयातील कर्मचारी श्रद्धा मोरे यांनी आपल्याला लस दिल्याचे त्या म्हणाल्या.  तसेच आपणही नोंदणी करून करोना लस घ्यावी, अस आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.