… अन्‌ पाकिस्तानी हल्ल्यातून भारतीय प्रवाशी विमान बचावले

नवी दिल्ली : पाकिस्तानी हवाई नियंत्रकांनी पाकीस्तानी लढाऊ विमाने एफ -16 विमनांच्या सहय्याने स्पाईसजेटच्या विमानत हस्तक्षेप केला होता. गेल्या महिन्यात ही घटना घडली होती.

बालकोटवरील भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानशी वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर ही घटना घडली होती. काबूलला जाणाऱ्या भारतीय प्रवासी विमानात हस्तक्षेप करण्यात आला. गेल्या महिन्यात घडलेल्या या घडनेचा थरार सुमारे तासभर सुरू होता. स्पाईस जेटचे विमान हवेत असताना पाकिस्तानी एफ 16 विमानांनी त्यांना घेरले. विमानचालकाला विमानाचा तपशील विचारला. ही घटना 23 सप्टेंबरला घडली. यावेळी एसजी 21 विमान होते. दिल्लीहून ते काबूलला जात होते. त्यात 120 प्रवासी होते. ही घटना घडली त्यावेळी भारतीय विमानांसाठी पाकिस्तानी हवाई हद्द खुली होती.

स्पाईसजेटच्या कॅप्टनने सांगितले की, हे व्यावसायिक प्रवाशी विमान आहे. त्यात प्रवासी आहेत. नियोजित वेळापत्रकाप्रमाणे ते काबूलला जात आहे, असे एएनआय वृत्तसंसथेला त्यांच्या सूत्रांकडून समजले.या विमनाला घेरलेले प्रावाशांनी पाहिले. काही प्रवाशांना त्यांचे पायलटही दिसले.

दरम्यान. पाकिस्तानी हवाई नियंत्रकाच्या गफलतीमुळे ही घटना घडली. स्पाईसजेटचा हवाई संकेतांक एसजी आहे. तर भारतीय हवाई दलाचा आयए आहे. हवाई नियंत्रकाने विमान सांकेतांक आयए पाठवल्याने पाकिस्तानी विमाने झेपावली होती. अफगाण सीमोपर्यंत या विमानांनी स्पाईसजेटच्या या विमानाच पाठलाग केला. हे विमान उतरल्यानंतर अफगाणीस्तानातील पाकिस्तानी दुतावासाने विमानाची सर्व कागदपत्रे तपासली. त्यामुळे परतीच्या उड्डाणासाठी सुमारे पाच तास उशीर झाला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)