तब्बल सात वर्षानंतर नाझरे धरण 100 टक्के भरले

 जेजुरी सह 47 गावांचा पाणीप्रश्न सुटणार
पुरंदर: अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी नगरी सह 47 गावाची तहान भागवणारे  नाझरे धरण तब्बल सात वर्षानंतर शंभर टक्के भरलय. त्यामुळे या भागातील शेतकरी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केलाय. पुरंदरच्या पुर्व भागात असलेले हे धरण पुरंदरच्या पुर्व भाग तर बारामतीच्या पश्चिम भागासाठी जीवनदायी ठरत आहे.

गेल्या सात वर्षांत पुरंदरच्या पश्चिम भागात फारच कमी पाउस पडत होता.त्यामुळे हे धरण पुर्ण क्षमतेने भरले नव्हते. 30 जुन पासुन या धरणातील पाणीसाठा पुर्णपणे संपला होता.या धरणावरील पाणीपुरवठा योजना अडचणीत आल्या होत्या.मात्र गेल्या 15 दिवसात या धरणाच्या  पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे हे धरण आता ओसांडुन वहात आहे.त्यामुळे बारामती तालुक्यातील पश्चिम भागात  नदीत असणारे छोटे बंधारे भरून या भागातील टंचाई दुर होणार आहे. त्याचबरोबर या धरणावरील पिण्याच्या पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत होणार आहेत.
नाझरे धरण पुर्ण भरलेय.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)