बीड – येथील आष्टी शहरातील आझादनगरमध्ये एका तरुणाने औरंगजेबचं स्टेट्स ठेवल्याने परिसरात तणाव निर्माण झालाय. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आष्टी बंदचे आवाहन केले होते. या स्टेटसमुळे दोन्ही समाजात तेढ निर्माण झाल्याची तक्रार आष्टी पोलिसांकडे करण्यात आली आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाने “बाप तो बाप रहेगा” अशा आशयाचे वाक्य टाकून धार्मिक भावना दुखवल्या असून दोन समजामध्ये तेढ निर्माण होईल असे कृत्य केले असल्याची तक्रार आष्टी ठाण्यात दिली.
त्या तक्रारीवरून जैद अय्युद सय्यद च्या विरोधात आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास एपीआय भाऊसाहेब गोसावी हे करत आहेत. दरम्यान औरंगजेबचं स्टेट्स ठेवण्याची हि पहिलीच घटना नाही.
शुभम शहाराम लोखंडे (वय-23वर्षे, रा.माळी गल्ली)आष्टी यांच्या फिर्यादीवरून आष्टी येथील रहीवाशी झैद अय्युब सय्यद यांचे इंन्स्टाग्राम अकाऊंट पाहिले असता त्याच्या अकाऊंटवर लबेका ग्रुप आष्टी या पेज वर औरंगजेब यांचा फोटो व त्या फोटोला “बाप तो बाप रहेगा” असे वाक्य टाकलेले दिसू आले. औरंजेबावरुन राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. आधी अहमदनगर औरंगजेबाचे पोस्टर्स झळकावण्यात आले नंतर कोल्हापुरातील एका युवकाने स्टेटलसा ओरंगजेबाचा फोटो ठेवल्याचं म्हटलं जातंय. या दोन्ही घटनामुळे संतापलेल्या हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत निषेध मोर्चे काढले.