दक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्य याने काही दिवसांपूर्वी त्याची पहिली पत्नी समंथा रुथसोबत घटस्फोट घेतल्याबाबत मौन सोडलं. एका पॅाडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने आम्ही एकमेकांनी एकमेकांच्या भल्यासाठी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. यानंतर आता समंथानेही या प्रकरणावर मौन सोडत तिच्या इन्स्टाग्रावर स्टोरीमध्ये स्वत:च्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची काळजी न घेतल्याने कशा पद्धतीने एखादं नातं संपुष्टात येऊ शकतं, याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ब्रिटीश लेखक जय शेट्टीने रिलेशनशिपबद्दल हे मत माडलं आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
तुम्हाला एक अविश्वसनीय जोडीदार आणि एक अविश्वसनीय नातं मिळू शकतं. ज्यामध्ये खरं प्रेम असण्याची क्षमता आहे. परंतु जर तुम्ही तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेत नसाल, तर तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी तुम्हाला हव्या त्या पद्धतीने उपस्थित राहू शकत नाही. त्या व्यक्तीबद्दल सर्वकाही परफेक्ट असू शकतं. सर्वकाही बरोबर असू शकतं. परंतु तुम्ही तुमचं स्वत:चं शरीर आणि मन यांचं स्वास्थ्य न बाळगल्याने कदाचित त्या व्यक्तीला, नात्याला गमावू शकतो, असे मत शेट्टीने या व्हिडिओत मांडल आहे.
नाग चैतन्य आणि समंथा रुथ हे दोघे २०१७ मध्ये विवाहबंधनात अडकले होते. लग्नाच्या चार वर्षांनंतर त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०२१ मध्ये दोघांनाही घटस्फोट घेतला. त्यानंतर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात नाग चैतन्यने अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी लग्न केले.
पॅाडकास्टमध्ये नाग चैतन्य काय म्हणाला होता ?
मी स्वत:ला एका अशा कुटुंबातून आलोय, जिथे नाती मोडलेली आहेत. त्यामुळे एखादं रिलेशनशिप संपवताना मी हजार वेळा विचार करतो. आम्हा दोघांना आपापल्या मार्गाने पुढे जायचं होतं. आमच्या वैयक्तिक कारणांमुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघं आपापल्या आयुष्यात पुढे निघून गेलोय. मला माझ्या आयुष्यात पुन्हा प्रेम मिळालंय. त्यामुळे मी खूप खुश आहे. आमच्या मनात एकमेकांविषयी प्रचंड आदर आहे, असे स्पष्टीकरण त्याने एका पॅाडकास्ट मुलाखतीवेळी दिले.