मुंबई – बिग बॉसच्या तिसऱ्या सीजनची सुरुवात चांगलीच धमाकेदार झाली आहे. आता सुरू होणार खरा खेळ ! बिग बॉस घरातील सदस्यांना नवनवे टास्क देत असतात. आणि टास्कमध्ये काही सदस्य बाजी मारतात तर काहींनाच्या हाती हार येते. बिग बॉस मराठी सिझन तिसराचा नॉमिनेशन टास्क पार पडल्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणर आहे.
याच दरम्यान चर्चेत आलेल्या बिग बॉसच्या घरातील सदस्य भूमाचा ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई आणि कीर्तनकार शिवलीला यांच्यातील एक संवाद चांगलाच चर्चेत आला आहे. यात प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी महिला तसेच मुलींवरील केलेल्या वादग्रस्त विधानावर तृप्ती देसाई यांनी इंदोरीकरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यावरूनच पुन्हा एकदा तृप्ती देसाईंनी इंदोरीकरांविरोधात बिग बॉसच्या घरात वक्तव्य केलं आहे.
त्या बोलतांना म्हणाल्या, इंदोरीकरांची बरीच कीर्तन ही महिलांचा अपमान करणारी होती, आम्ही त्यांच्याविरोधात आंदोलन केलं होतं. आमच्या आंदोलनानंतर त्यांची अनेक कीर्तन यु ट्यूबवरून डीलीट करण्यात आलीत. त्यानंतर शिवलीला म्हणतात की, त्यावेळी अनेक कीर्तनकारांनी आपली कीर्तन डीलीट केली होती.
दरम्यान,इंदोरीकर यांनी कीर्तनातून अंधश्रद्धा पसरवणारे वादग्रस्त वकतव्य केले होते. महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करत जाहीररित्या अपमान केला,’ असा आरोप करत या विषयावरून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी ऍड. मिलिंद पवार यांच्यामार्फत 26 फेब्रुवारी रोजी कायदेशीर नोटीस बजावली होती.