राज्यपालांसोबत भेटीनंतर मदन शर्मा म्हणाले, ‘आजपासून मी ‘भाजप-आरएसएस’सोबत…’

मुंबई – शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकाऱ्याला केलेल्या कथित मारहाणीनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आज मारहाण झालेल्या मदन शर्मा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.

या भेटीनंतर शर्मा यांनी आपण आतापासून भाजप व आरएसएससोबत असल्याचं म्हंटल.

“आजपासून मी भाजप व आरएसएससोबत आहे. मला जेव्हा मारहाण झाली होती, तेव्हा त्यांनी माझ्यावर भाजप-आरएसएससोबत असल्याचा आलं लावला होता. त्यामुळे आतापासून मी भाजप आणि आरएसएससोबत आहे.” असं शर्मा यांनी सांगितलं.

तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विडंबन करणारे एक व्यंगचित्र सोसायटीच्या व्हॅट्सऍप ग्रुपवर टाकल्याने त्यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला, असा आरोप आहे.

या हल्ल्यानंतर शर्मा यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली व देशाची माफी मागावी, तसेच राज्य चालवता येत नसल्यास पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी शर्मा यांनी केली होती.   

Leave A Reply

Your email address will not be published.