मुंबई – प्रसिद्ध चित्रपट निर्माते हंसल मेहता यांनी नुकतेच वयाच्या ५४ व्या वर्षी आपल्या जोडीदाराशी लग्न केले. बुधवारी हंसल यांनी सैफीनाचा हात कायमचा धरला. हंसल यांनी स्वतः इन्स्टाग्राम हँडलवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. दोघेही 17 वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहत होते. दोघांनाही दोन मुलं आहेत, तर बऱ्याच काळानंतर दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
हंसल मेहताने नुकतेच इन्स्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. ही खास छायाचित्रे शेअर करण्यासोबतच ते लिहितात,’17 वर्षांपासून आम्ही दोघांनी आमच्या मुलांना मोठे होताना पाहिले आहे. आम्ही आमची सर्व स्वप्ने पूर्ण केली आहेत. त्याचबरोबर आता लग्नाचे स्वप्नही पूर्ण करायचे ठरवले आहे. नेहमीप्रमाणे ते कोणतेही नियोजन करून झाले नाही. शेवटी, प्रेम सर्वकाही घडवून आणते.’
चाहत्यांसह बॉलिवूडचे प्रसिद्ध स्टार्सही हंसल मेहता आणि सफिना यांना लग्नासाठी शुभेच्छा देत आहेत. या नव्या प्रवासासाठी अभिनेत्री हुमा कुरेशी, अभिनेता प्रतीक गांधी, अभिनेता राजकुमार राव, निर्माती एकता कपूर, अभिनेता मनोज बाजपेयी असे अनेक स्टार्सने यांचे अभिनंदन केले आहे.