बेंगळुरु – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याचे जेव्हा मला समजले तेव्हा खूप निराश झालो, असे मत चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू क्रिकेटपटू दीपक चहर याने व्यक्त केले आहे. दरम्यान, आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर दीपक चहरनं सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली आहे.
— Deepak chahar 🇮🇳 (@deepak_chahar9) April 15, 2022
वेस्ट इंडीजविरुद्ध झालेल्या मालिकेत मला दुर्दैवाने दुखापत झाल्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. मला खेळण्याची इच्छा होती, मात्र दुखापतीमुळे ते शक्य नसल्याने खूप निराश झालो आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या लिलावात चेन्नईने चहरसाठी 14 कोटी रुपये मोजले होते.
पायाच्या दुखापतीमुळे त्याला सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागले. मात्र, बेंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) उपचार घेतल्यानंतर एप्रिलच्या मध्यात तो चेन्नई संघात दाखल होणार होता. पण एनसीएमध्ये सरावादरम्यान चहरच्या पाठीला पुन्हा दुखापत झाल्यामुळे त्याला यंदाच्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे.