जामखेड – कर्जत नगरपंचायतीच्या भाजपच्या दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असताना जामखेड नगरपरिषदेच्या तीन नगरसेवकांनीही कमळ सोडून घड्याळ बांधले आहे नगरसेवकांच्या प्रवेशामुळे भाजपचे माजीमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.
जामखेड येथील विश्रामगृहामध्ये प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती सुभाष आव्हाड, सूर्यकांत मोरे, दयानंद कथले, सतिष चव्हाण, बापूराव शिंदे, अमोल जावळे, पिंटू काळे, अशोक धेंडे दादासाहेब भोरे, अमित जाधव, असिफ शेख यांच्या उपस्थितीत जामखेड नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश निमोणकर, मोहन पवार, राजेश वाव्हळ या तिनही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर केला. दरम्यान गेल्या काही महिन्यांपूर्वी अकरा नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून भाजपाच्या ताब्यात असलेली जामखेड नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला होता