स्वातंत्र्यानंतर 11 गावातील कोणीही चढले नाही कोर्टाची पायरी

ओरैया (उत्तर प्रदेश) : शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये अशी अशी एक म्हण आहे. उत्तर प्रदेशातील ओरैया जिल्ह्यातील 11 गावांनी ही गोष्ट पूर्णपणे प्रत्यक्षात आणली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आजतागायत या 11 गावांमधून एकही प्रकरण कोर्टात गेलेले नाही. पंच परमेश्‍वर ही गोष्ट त्यांच्या बाबतीत अगदी खरी आहे.

पूर्वजांचे संस्कार, सदभावना जाणत्यांचा आदर करणे पिढ्यानपिढ्या चालत आल्याने गेल्या 70 वर्षांत या अकरा गावांमध्ये धर्म-जातीबाबत कोणतेही विवाद होत नाहीत आणि काही वैयक्तिक विवाद असले तर ते आपसातच मिटवले जातात. एकी हाच त्यांचा धर्म आहे. होळी असो, दिवाळी असो, ईद असो की बकरीद असो सारे जण एकत्रच साजरी करतात. अशी माहिती पोलीस अधीक्षक त्रिवेणी सिंह यांनी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चकसुमरेपूर, कल्याणपूर, सरसै, साबलपूर, भगवंतपूर, नंदूपूर, ग्यानपूर, मूणपुला, मनीपूर, बदनपूर आणि मडैना ही ती आकरा गावे आहेत. या गावातील गावकऱ्यांचा एका समारंभात सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक त्रिवेणी सिंह यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)