नवी दिल्ली – देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची बाधा झाली आहे. स्वतः अमित शाह यांनी याबाबत ट्विट करत आपला कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आल्याची माहिती दिली. अमित शाह यांना कोरोना बाधा झाल्याचे वृत्त समजताच त्यांची कोरोनातून लवकरात लवकर सुखरूप सुटका व्हावी यासाठी अनेकांनी प्रार्थना केली आहे.
दरम्यान, गृहमंत्री अमित शाह यांना कोरोना बाधा झाल्याच्या वृत्तानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील त्यांची कोरोना आजारातून लवकरात लवकर मुक्तता व्हावी अशी सदिच्छा व्यक्त केली आहे. याबाबत ट्विट करताना ते म्हणतात, “श्री अमित शाह हे लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा.”
Wishing Mr Amit Shah a speedy recovery.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 2, 2020
तत्पूर्वी, आज दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून, “कोरोनाची काही प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर मी स्वतःची कोरोना चाचणी करून घेतली होती. माझा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता मी रुग्णालयात भरती होणार आहे. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःला आयसोलेट करून कोरोना चाचणी करून घ्यावी.” असं ट्विट करत आपल्याला कोरोना बाधा झाल्याची माहिती दिली होती.
कोरोना के शुरूआती लक्षण दिखने पर मैंने टेस्ट करवाया और रिपोर्ट पॉजिटिव आई है। मेरी तबीयत ठीक है परन्तु डॉक्टर्स की सलाह पर अस्पताल में भर्ती हो रहा हूँ। मेरा अनुरोध है कि आप में से जो भी लोग गत कुछ दिनों में मेरे संपर्क में आयें हैं, कृपया स्वयं को आइसोलेट कर अपनी जाँच करवाएं।
— Amit Shah (@AmitShah) August 2, 2020