गुलामनबी आझाद यांनी पंतप्रधानांचे जाहीर कौतुक केल्यानंतर जम्मू काश्‍मीर प्रदेशाध्यक्ष राहुल गांधींच्या भेटीला

जम्मू – जम्मू काश्‍मीरचे प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मिर यांनी आज राहुल गांधी यांची भेट घेऊन राज्यातील नवीन राजकीय स्थिती बाबत चर्चा केली. या राज्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी पंतप्रधान मोदींचे जाहीर कौतुक केल्याने येथील कॉंग्रेस कार्यकर्ते संतापले असून त्यांनी काल आझाद यांच्या विरोधात निदर्शने करून त्यांचे पुतळे जाळण्याचा प्रकार घडला होता.

या पार्श्‍वभूमीवर हीं भेट महत्वाची मानली जात आहे. पक्षाच्या कामकाजाच्या संबंधात राहुल गांधी यांच्याकडून काही सल्ला मागण्यासाठी त्यांनी ही भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. तसेच जम्मू काश्‍मीरातील सद्य स्थितीवरहीं त्यांनी राहुल गांधी यांना कल्पना दिली.

राज्यातील मोदी नियुक्त प्रशासनाच्या गैरकाराभाराच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊन आवाज उठवत राहा असा सल्लाही राहुल गांधी यांनी मिर यांना दिल्याचे सांगितले जाते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.