लिस्बन – जगात करोना लसीच्या आपात्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, फारझरच्या करोना लसीचे साईड इफेक्ट होत असल्याची प्रकरणे समोर आली आहे. यूके, अमेरिका, फिनलॅंड, बुल्गारिया, पोर्तुगाल, यासह मेक्सिको सिटीमध्ये गंभीर प्रकरण दिसून आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पोर्तुगालमध्ये आरोग्य कर्मचाऱ्याचा लस घेताच 48 तासांतच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोनिया असेवेडो (वय-41) यांनी लस घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये कोणतेही दुष्परिणाम दिसून आले नाही. मात्र, नंतर त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्या पोर्तो शहरातील पोर्तुगीज इन्स्टिट्युट ऑफ ऑन्कोलाॅजीमध्ये काम करत होत्या.
सोनिया यांचे वडिल अबिलियो असेवेडो यांनी पोर्तुगाल डेली वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, सोनिया या एकदम ठीक होत्या, स्वस्थ होत्या. त्यांना कोणताही आजार नव्हता. लस घेतल्यानंतरही कोणतेही दुष्परिणाम दिसले नाही.मात्र, नंतर अचानक मृत्यू झाला.
दुसरीकडे मेक्सिकोमध्ये डाॅ. कार्ला यांना करोना लस दिल्यानंतर त्यांना त्वचेचे इन्फेक्शन झाले. नंतर लकवा मारला. अशक्तपणासह श्वास घेण्यासही त्रास होत होता. त्यानंतर त्यांना आयसीयू मध्ये भरती करण्यात आले. फिनलॅंडमध्येही पाच लोकांमध्ये लशीचे गंभीर दुष्परिणा दिसून आले होते.