काऱ्हाटी परिसर पाच वर्षांनंतर चिंब

काऱ्हाटी – नाझरे धरणासह काऱ्हाटी परिसरात मंगळवारी (दि. 24) सायंकाळनंतर रात्रभर पाऊस कोसळल्याने नाझरे धरण “ओव्हरफ्लो’ झाल्याने धरणातून 24 हजार क्‍युसेकने विसर्त सोडण्यात आल्याने कऱ्हा नदीवरील सर्व बंधारे पाच वर्षांनंतर दुथडी भरून वाहु लागल्याने महिलांनी ओटी भरण्याचा आनंद घेतला.

काही दिवसांपूर्वीच नाझरे धरण 100 टक्‍के भरल्याने वरील येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे बुधवारी (दि. 25) धरणातून 24 हजार क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर ते 10 हजार क्‍युसेकवर आणण्यात आले. कऱ्हा नदीवरील आंबी, जवळार्जुन, मोरगाव, बाबुर्डी, माळवाडी, काऱ्हाटी, फोंडवाडा, जळगाव, अंजनगाव, कऱ्हावागज, मेडद येथे एकूण 31 बंधारे असून ते पूर्ण भरले जातील, अशी माहिती एस. जी. चौलंग यांनी दिली. तसेच नदीकाठच्यांना सतर्कतेचा इशारा दिला असल्याचे पोलीस पाटील संजय लोणकर, कल्पना लडकत यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.