बंगळुरू – करोनातून मुक्त झालेल्या लोकांना विविध आजारांना समोरं जाव लागत आहे. मागील काही दिवसांपासून ब्लॅक फंगस आजाराने धुमाकूळ घातला असताना करोनानंतरच्या आणखी एका आजाराची आता भर पडली आहे. दावनगिरी जिल्ह्यातील १३ वर्षीय बालकांना या दुर्लभ आजाराची बाधा झाली आहे.
करोनामुक्त झालेल्या 13 वर्षीय मुलाला ‘एएनएसी’ अर्थात ‘एक्युट नेक्रोटायजिंग एन्सेफेलोपॅथी ऑफ चाईल्डहूड’ नावाच्या दुर्लभ आजाराची लागण झाली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या आजाराची ही देशातील दुसरी तर राज्यातील पहिली केस आहे.
एस.एस. इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्स अँड रिसर्चचे निर्देशक डॉ. एन.के. कलाप्पनवर यांनी सांगितलं की, सुरुवातीला डॉक्टरांनी जेव्हा मुलाची तपासणी केली, त्यावेळी मुलाचा मेंदू निष्क्रिय आढळून आला. त्यामुळे मुलाला तीन दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला व्हेंटिलेटरवरून काढण्यात आलं आहे.
मुलावर आणखी एक आठवडा उपचार करण्याची आवश्यकता आहे. मात्र प्रकृती ठिक झाल्यानंतरच त्याच्या मेंदूवर किती परिणाम झाला हे कळेल, असंही डॉ. कलाप्पनवर यांनी सांगितले.
या आजारावरील उपचार महागडे असून 30 किलो वजन असलेल्या मुलासाठीच्या एका इंजेक्शनची किंमत 75 हजार ते एक लाख रुपयांपर्यंत आहे.
A 13-year-old boy in Karnataka’s Davanagere has been diagnosed with Acute Necrotizing Encephalopathy of Childhood, a condition that affects brain, post-COVID recovery. This is probably the first case in a child post-recovery: Dr Kalappanavar, Medical Director SSIMS, Davanagere pic.twitter.com/cEuh3tXzgv
— ANI (@ANI) June 28, 2021
अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाच्या वतीने म्हटलं की, एएनएसी हा आजार डोक्यावर गंभीर परिणाम करणारा ज्वर आहे. व्हायरल संसर्गानंतरच या आजाराची लागण होते. या आजारासाठी पर्यावरणीय किंवा अनुवांशिक कारणही असू शकते.