मुंबई आम आदमी पक्षाचे नेते राघव चड्डा आणि बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा या दोघांना नुकतंच एका ठिकाणी स्पॉट करण्यात आलं. यानंतर सोशल मीडियावर दोघांचे फोटो खूपच व्हायरल झाले. यानंतर आता राघव चड्डा यांनी याबाबत भाष्य केले आहे.
आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा आणि परिणीती गुरुवारी एका रेस्टॉरंटमध्ये दिसले. समोर आलेल्या फोटोंमध्ये दोघेही पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्माईल देताना दिसत आहेत. या फोटोजनंतर अनेक प्रकारच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले होते. सध्या लोकसभा आणि राज्यसभेचे अधिवेशन देखील सुरु आहे. यादरम्यान राज्यसभा अध्यक्षांनी देखील यावर भाष्य केल्याचे समजते.
राज्यसभेच्या अध्यक्षांनी नुकतेच सभागृहादरम्यान सांगितले की, सोशल मीडियावर तुम्हाला खूप स्पेस मिळत आहे. आजचा दिवस कदाचित तुमच्यासाठी मौनाचा दिवस आहे. हे ऐकून सभागृहात उपस्थित सर्व नेते हसू लागले. नेते राघव यांनीही याबाबत बोलताना मीडियासमोर म्हटले की, तुम्ही मला परिणीतीबद्दल नाही तर राजकारणावर प्रश्न विचारता. तरीही मीडियाने यावर अनेक प्रश्न विचारले. आतापर्यंत अभिनेत्री परिणीतीची कोणतीही प्रतिक्रिया याबाबत समोर आलेली नाही.
गुरुवारच्या भेटीनंतर राघव आणि परिणीतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले, ज्यानंतर लोकांनी त्यांच्या नात्याची चर्चा सुरू केली. काहींनी सोशल मीडियावर राघव आणि परिणीती एकमेकांना डेट करत आहेत का? असे देखील प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली, या प्रश्नावर दोघांकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
परिणीती लवकरच कॅप्सूल गिल आणि चमकीला या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटांपूर्वी परिणीती अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘हाइट’ या चित्रपटात दिसली होती.