मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्या भावून झाल्याचे बघायला मिळाल्या आहेत.
डॉ. प्रज्ञा सातव म्हणाल्या की, याआधी हिंगोलीत मी राजीवच्या साथीने काम करायचे पण आज मी एकटी पडली आहे, अशावेळी राजीवला मिस करत आहे. अशा शब्दात पती राजीव सातव यांच्या आठवणींना उजाळा देत त्या भावूक झाल्या आहेत. त्या एका वृत्तवाहीनीशी संवाद साधत होत्या.
दरम्यान, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कार्यकरिणी घोषित केली आहे. यामध्ये १८ उपाध्यक्ष, ६५ जनरल सेक्रेटरी, 104 सेक्रेटरी आणि सहा प्रवक्तांचा समावेश आहे.