मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता कंगनाने पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कंगनाच्या हातात तलवार देतानाचा काल्पनिक प्रसंग चितारण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रावणाप्रमाणे दहा तोंडे दाखवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या चित्रासोबत कंगनाने मराठीत ट्विट केले आहे.
Received many memes, this one sent by my friend @vivekagnihotri ji made me emotional.
लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन.
जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन
जय हिंद, जय महाराष्ट्र 🙏 pic.twitter.com/c4KvpVcqX1— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 12, 2020
आपल्या ट्विट मध्ये कंगना म्हणते कि, “झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन… जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन जय हिंद, जय महाराष्ट्र” असं कंगनाने मराठीत ट्विट करत म्हंटलं आहे.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी तिला हा फोटो पाठवल्याचं कंगना राणावतने सांगितलं आहे. दरम्यान, मुंबईतील पाली हिल परिसरात असलेल्या कंगनाच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने ऑफिसचे टाळे तोडून कार्यलयाची तोडफोड केल्यानंतर कंगनाने एकापाठोपाठ एक ट्वीट करून शिवसेनेवर सडकून टीका केली.