Maharashtra Assembly Elections 2024 : महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सत्यशील शेरकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी संवाद बैठकीत मध्ये एकदिलाने लढत जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला.
लेण्याद्री येथे पार पडलेल्या या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद लेंडे, अनंतराव चौगुले, अंकुश आमले, तालुकाध्यक्ष तुषार थोरात, तुळशीराम भोईर, शंकर घोडे, बाबाजी शिंदे, शेखर गणेशकर, सुरेखा वेठेकर, अर्चना भुजबळ, चंदाताई गडगे, उमेदवार सत्यशील शेरकर यांच्यासह आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना शरद लेंडे म्हणाले की, लोकांच्या मनातील उमेदवार ओळखून तरुण कार्यकर्त्याला उमेदवारी दिली त्याबद्दल शदरचंद्र पवार साहेबांना आम्ही धन्यवाद देतो. आता आपण एकच निर्धार करायचा आहे. एकजुटीने काम करत आपल्याला पवार साहेबांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवायचा आहे.
सत्यशील शेरकर म्हणाले की, जुन्नर विधानसभेच्या लढाईला सामोरे जात असताना आपल्या विभागाचे संसदरत्न खासदार डॉ.अमोलदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी, पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपण पुढे जाणार आहोत. तालुक्यातील जनतेचा चांगला प्रतिसाद महाविकास आघाडीला मिळत असून नक्कीच लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही परिवर्तन होईल, याची मला खात्री आहे.