काश्‍मीरची पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू

नवी दिल्ली : तब्बल 70 दिवसांनंतर काश्‍मिरमधील बीएसएनएल पोस्टपेड मोबाईल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र अद्याप इंटरनेटसेवा सुरू केलेली नाही.

काश्‍मीर खोऱ्यातील परिस्थती पाहून ती सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय घेण्यात येईल. अतिरेकी हल्ले आणि जनआंदोलन कसे वळण घेतात, यावर ही सेवा सुरू ठेवण्याचा निर्णयब अवलंबून असेल. दि. पाच ऑगस्टला लागू केलेले निर्बंध शिथिल करण्याची सुरवात या निर्णयापसासून झाली आहे, असे काश्‍मिर प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सर्वच मोबाईल सेवा सोमावरी दुपाती 12 वाजल्यापासून सुरू करण्यात येतीळ. मात्र प्रिपेड मोबाईल आणि इंटरनेट सेवा खंडित ठेवण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.