मुंबई – कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव लक्ष्यात घेता देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा सुरू नाहीयेत. लॉकडाऊन मुळे सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार आपल्या घरात बसून आहेत. तर काही कलाकारांना त्यांच्या आप्तजनांपासून कित्येक दिवस दूर राहावं लागलं.
बॉलिवूडचा भाईजान हा त्यापैकीच एक आहे. सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर वास्तव्यास आहे. लॉकडाऊनचा संपूर्ण काळ सलमान तिथे आहे. मात्र नुकतंच सलमानने आपल्या आईवडिलांची भेट घेतल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
सूत्रांच्या माहिती नुसार, सलमान मंगळवारी वांद्रे येथील त्यांच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आला. येथे आल्यानंतर त्याने आपले वडील सलीम खान आणि आई सल्मा यांच्याबरोबर थोडा वेळ घालवला, त्यांच्याशी गप्पा मारल्या, यावेळी सलमान अतिशय भावुक झाला होता. नंतर तो पनवेलमधल्या आपल्या फार्म हाऊसमध्ये परत आला. यासाठी त्याने प्रशासनाकडून खास परवानगी घेतली होती आणि यावेळी त्यांनी सोशल डिस्टंन्सिंग देखील राखले.