पुणे – पर्वती मतदारसंघासाठी एकूण 16 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी अपक्ष उमेदवार दीपक घुबे यांचा अर्ज छाननीत बाद झाला. त्यांनी अर्ज अपूर्ण भरल्याने तो नामंजूर करण्यात आला आहे. आता 15 अर्ज वैध ठरले आहेत.
सणस मैदान निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज छाननी पार पडली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अश्विनी कदम यांचे पती नितीन कदम यांनी अपक्ष म्हणून दाखल केलेला अर्जही मंजूर झाला आहे. या मतदारसंघात महायुती-माधुरी मिसाळ, आघाडी-अश्विनी कदम, आप-संदीप सोनवणे, बसपा-रवींद्र क्षीरसागर, बहुजन मुक्ती पार्टी-शतायु भागले, वंचित बहुजन आघाडी-ऋषिकेश नांगरे-पाटील यांच्यासह परमेश्वर जाधव, अरविंद करमरकर, रोहित नारायणपेठ, नितीन कदम, जयदेव इसवे, राहुल खुडे, निखिल शिंदे, सुरेश चौधरी यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी भानुदास गायकवाड यांनी अर्जांची छाननी केली.