लॉकडाउनमध्ये काही शर्ती लागू करत शूटिंगला परवानगी दिल्यानंतर अभिनेता आफताब शिवदासानी आपल्या “प्वॉइजन-2′ या वेब सिरीजसाठी सज्ज झाला आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात आफताब शोच्या निर्मात्यांसह कसे सोशल डिस्टन्सिंग ठेवत नियमांचे अनुसरण करत असल्याचे दिसते. तसेच तो मास्कही घातलेला दिसत आहे.
आफताब शिवदासानी हा “प्वॉइजन-2′ या वेब सिरीजद्वारे डिजिटल जगात पाऊल ठेवण्यासाठी खूपच रोमांचित आहे. या संदर्भात आफताबने म्हणाला, “प्वॉइजन-2’मध्ये सहभागी होताना मला खूप आनंद झाला आहे. कारण मला नेहमीच वेगळी भूमिका साकारण्याची इच्छा होती आणि “प्वॉइजन-2′ स्क्रिप्टने मला ती संधी दिली आहे.
आफताब म्हणाला, ‘मी झी-5 आणि दिग्दर्शक विशाल पांड्या यांच्याबरोबर काम करण्यासही खूप उत्सुक आहे, जे बऱ्याच काळापासून माझे मित्र आहेत. वेबस्पेस ही अशी गोष्ट आहे जिथे मी काम केले नाही. या कामामुळे ही खूपच आनंदी आहे. या ऍक्शन-क्राइम थ्रिलरच्या दुसऱ्या सीजनमध्ये आफताबने आदित्यसिंह राठोडची भूमिका साकारली आहे. या वेब सिरीजचा पहिला सीझन गतवर्षी रिलीज करण्यात आला होता. त्यात अरबाज खान आणि तनुज विरवानी मुख्य भूमिकेत होते.