#AFGvWI T20 Series : तिसऱ्या सामन्यासह अफगाणिस्तानचा २-१ ने मालिका विजय

लखनौ : अफगाणिस्तान आणि विंडीज यांच्यात झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात अफगाणिस्ताने विंडीजवर २९ धावांनी विजय मिळवला. या विजयासह अफगाणिस्तानने तीन टी-२० सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. अफगाणिस्तानकडून फलंदाजीत ५२ चेंडूत ७९ धावा करणारा रहमानुल्लाह गुरबाज सामन्याचा मानकरी ठरला.

विजयासाठी १५७ धावांचा पाठलाग करताना विंडीजच्या संघास २० षटकांत ७ बाद १२७ धावसंख्येपर्यतच मजल मारता आली. विंडीजची सुरूवात खराब झाली. सलामीवीर लेंडल सिमंसला मुजीब उर रहमानने ७ धावांवर त्रिफळाचित केले तर तिस-या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या ब्रैंडन किंगला सुध्दा १ धावांवर नवीन उल हकने त्रिफळाचित करत विंडीजला १६ धावसंख्येवर दुसरा झटका दिला. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या एविन लुइसने २३ चेंडूत २४ आणि शाइ होपने ४६ चेंडूत ५२ धावा करत संघास विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला पण ते अपयशी ठरले. शाइ होपला गुल्बदीन नाएबने बाद करत संघाचा विजय सुकर केला. शिमरन हेटमायर ११, कायरन पोलार्ड ११, जेसन होल्डर ६ धावांवर झटपट बाद झाल्याने विंडीजला पराभवास सामोरे जावे लागले.

अफगाणिस्तानकडून नवीन उल हकने ४ षटकांत २४ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. मुजीब उर रहमान, करीम जनत, गुल्बदीन नाएब आणि राशिद खान यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.

तत्पूर्वी, अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १५६ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानची सुरूवात खराब झाली. सलामीवीर हजरत जजई (०), करीम जनत (२) आणि इब्राहिम जदरान (१) धावांवर बाद झाले. मात्र रहमानहुल्लाह गुरबाजने ५२ चेंडूत ७९ आणि असगर अफगान २४, मोहम्मद नबी १५, नजीबुल्लाह जादरानने १४ धावा करत संघाची धावसंख्या १५६ पर्यत नेली.

विंडीजकडून कीमो पाॅल, केसरिक विलियम्स, शेल्डन काॅटरेल यांनी प्रत्येकी २ तर कायरन पोलार्डने १ गडी बाद केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.