#CWC19 : नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा फलंदाजीचा निर्णय

लीड्‌स – भारताकडून झालेला पराभवानंतर प्रतिष्ठा व बाद फेरीचे आव्हान राखण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवीत पाकिस्तानने या स्पर्धेत जोरदार कमबॅक केले आहे. दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड या दोन बलाढ्य संघांना पराभूत करणाऱ्या पाकिस्तानचे पुढचे “लक्ष्य” अफगाणिस्तानवर मात करण्याचे असणार आहे. भारताविरुद्ध विजयाच्या उंबरठ्यावरून पराभव पत्करणारा अफगाणिस्तानचा संघ आज त्यांना चिवट झुंज देईल अशी अपेक्षा आहे.

विश्वचषक स्पर्धेतील अफगाणिस्तान विरूध्द पाकिस्तान या सामन्यास थोड्याच वेळात हेडिंग्ले, लीड्स येथील मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा अफगाणिस्तानने जिंकला असून कर्णधार गुलाबदिन नईब याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

अफगाणिस्तान :

गुल्बदिन नाएब, रहमत शाह, हशमातुल्ला शाहिदी, असग़र अफगान, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह ज़ादरान, समीउल्लाह शेनवारी, राशिद ख़ान, इकराम अली ख़िल, हामिद हसन, मुजीब उर रहमान

पाकिस्तान :

फ़ख़र ज़मान, इमाम-उल-हक, बाबर आज़म, मोहम्मद हफीज़, हारिस सोहैल, सरफ़राज़ अहमद, इमाद वसीम, शादाब ख़ान, वहाब रियाज, मोहम्मद आमिर, शाहीन अफ़रीदी

Leave A Reply

Your email address will not be published.