#CWC19 : नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानचा गोलंदाजीचा निर्णय

साउदॅम्पटन – भारताला रडकुंडीस आणणाऱ्या जिगरबाज अफगाणिस्तानविरूद्ध लढवय्या बांगलादेशची आज कसोटी ठरणार आहे. हा सामना जिंकून उपांत्य फेरीसाठी आव्हान कायम ठेवण्याची संधी बांगलादेशला मिळणार आहे.

विश्वचषक स्पर्धेतील अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील सामन्यास थोड्याच वेळात साउदॅम्पटन येथील दी रोझ बाऊल मैदानावर सुरूवात होणार आहे. तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा अफगाणिस्तानच्या बाजूने लागला आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलाबदीन नईब याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

बांग्लादेश –

तमीम इक़बाल, सौम्य सरकार, शाकिब अल हसन, मुशफ़िकुर रहीम, लिटन दास, महमूदुल्लाह, मोसद्दक हुसैन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहंदी हसन, मशरफे मोर्तज़ा, मुस्तफ़िज़ुर रहमान

अफगाणिस्तान –

गुल्बदिन नाएब, रहमत शाह, हशमातुल्ला शाहिदी, असग़र अफगान, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह ज़ादरान, समीउल्लाह शेनवारी, राशिद ख़ान, इकराम अली ख़िल, दौलत ज़ादरान, मुजीब उर रहमान

Leave A Reply

Your email address will not be published.