#CWC19 : बांगलादेशचे अफगाणिस्तानसमोर 263 धावांचे लक्ष्य

साउदॅम्पटन – मुशफकीर रहीम आणि शाकिब अल हसन यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बांगलादेशने अफगाणिस्तानसमोर विजयासाठी 263 धावांचे आव्हान ठेवले आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलाबदीन नईब याने नाणेफेक जिंकत बांगलादेश संघास प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशच्या संघाने 50 षटकांत 7 बाद 262 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे.

बांगलादेशकडून फलंदाजीत मुशफकीर रहीमने 87 चेंडूत सर्वाधिक 83 आणि शाकिब अल हसन याने 69 चेंडूत 51 धावा केल्या. याशिवाय तमीम इकबालने 36 मोसद्दक हुसैन याने 24 चेंडूत 35 धावा केल्या.

अफगाणिस्तान संघाकडून गोलंदाजीत मुजीब उर रहमान याने 10 षटकांत 39 धावा देत 3 गडी बाद केले. तर गुल्बदिन नाएबने 2 आणि मोहम्मद नबी, दौलत जादरान यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.