काबूल – अफगाणिस्तानमध्ये तालिबानने मुलींना विद्यापिठांमधील प्रवेश परीक्षांना मज्जाव केला आहे. विद्यापिठांमधील प्रवेश परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार आहेत. या परीक्षांना मज्जाव केल्यामुळे आता मुलींना आता विद्यापिठांच्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे शक्य होणार नाही. तालिबानकडून मुलींच्या शिक्षणावर घालण्यात आलेला हा आणखीन एक जाचक निर्बंध आहे.
उच्च शिक्षणासाठीचा तालिबानचा शिक्षण मंत्रालयाने सर्व विद्यापिठांना यासंदर्भातील नोटीस पाठवली आहे. पुडील सूचना मिळेपर्यंत मुलींना परीक्षांची परवानगी देण्यात येऊ नये, असे या नोटीसीमध्ये म्हटले आहे. म्हणजेच शैक्षणिक वर्षासाठी होणाऱ्या विद्यापिठांच्या प्रवेश परीक्षांना मुलींना बंदी घालण्यात आली आहे, असाच अर्थ होतो.
काही महिन्यांपूर्वीच तालिबानच्या हंगामी सरकारने महिलांना बिगर सरकारी संघटनांमध्ये काम करण्याची परवानगी देखील नाकारली होती. देशात आणि परदेशातही या निर्णयाच्या विरोधात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
Thailand : राजधानी बॅंकॉकमध्ये वायूप्रदूषण धोकादायक पातळीवर; प्रशासनानं लोकांना….
मुलींना विद्यापीठ शिक्षणावर बंदी घातली गेल्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत असलेल्या “एज्युकेशन कॅन नॉट वेट’ या शिक्षण विषयक संघटनेने ही बंदी उठवण्याचा जोरदार आग्रह तालिबान प्रसासनाकडे केला होता. त्यापूर्वी इस्लामिक सहकार्य संघटनेच्या बैठकीत देखील तालिबानच्या या बंदीबाबत विचार करण्यात आला होता. या संघटनेने आणि अन्य इस्लामी देशानीही तालिबानच्या या बंदीवर टीका केली होती.