#CWC19 : अफगाणिस्तानच्या खेळाडूंचा हॉटेलमध्ये राडा

कर्णधाराकडून आरोपांचे खंडन

मॅंचेस्टर – मैदानात गुणवान संघ म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानचा संघ मैदानाबाहेरील कामगिरीमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. मॅंचेस्टरमध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या पराभवाच्या आदल्या रात्री अफगाणिस्तानच्या टीममधील सदस्यांचा एका रेस्टॉरंटमध्ये मोठा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रेस्टॉरंट मालकांनी थेट पोलिसांना बोलावले.

मिळालेल्या वृत्तानुसार, रेस्टॉरंटमध्ये आलेल्या काही लोकांपैकी एकजण अफगाणिस्तानच्या संघाचा व्हिडिओ काढत होता. त्याला खेळाडूंनी विरोध दर्शवला. त्यावरून झालेला वाद टोकाला गेल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवला.

मात्र, अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नईब याला रेस्टॉरंटमधील घटने संदर्भात विचारण्यात आले असता त्याने ही घटना कथित असल्याचे सांगितल आहे. तसेच या कथित घटनेबाबत मला फारशी माहिती नसल्याचेही नईब म्हणाला. तो म्हणाला.

दरम्यान याबाबत स्थानिक पोलिसांनी सांगितले की, रात्री सव्वा अकराच्या सुमारास पोलिसांना रेस्टॉरंटमधील वादावादीची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या भांडणांत कोणालाही कोणतिही इजा झालेली नाही तसेच, कोणाला अटकही झालेली नाही. प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

“नाही मला याविषयी काहीच माहिती नाही. तुम्ही माझ्या सुरक्षा अधिकाऱ्यांना याबाबत विचारू शकता. मला या विषयी खरंच काही माहिती नाही. मुळात हा माझ्या टीमसाठी खूप मोठा विषय नाही.’
– गुलबदीन नईब ,कर्णधार अफगाणिस्तान

Leave A Reply

Your email address will not be published.