लंडन – पाच वेळा विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघासमोर आज कडव्या आफगाणिस्तानचे आव्हान असुन आजच्या सामन्यातुन स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत संघाकडून पुनरागमन करणार आहेत.
तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा आफगाणिस्तानने जिंकला असून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामना सुरू झाला असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा आफगाणिस्तानच्या 7 षटकांत 2 बाद 30 धावा झाल्या आहेत. आफगाणिस्तानचे सलामीवीर फलंदाज मोहम्मद शहजाद आणि हजर तुल्लाह हे शून्यावर माघारी परतले आहेत. तर रहमत शाह 21 आणि हशमातुल्ला शाहिदी 6 धावांवर खेळत आहे.
#GulbadinNaib has won the toss and opted to bat first at Bristol!
Will you be shouting #CmonAussie or are you backing #AfghanAtalan?#AFGvAUS LIVE 👇 https://t.co/EONMb3ycoN pic.twitter.com/Evmihq33cC
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) June 1, 2019
आफगाणिस्तान संघ –
मोहम्मद शह्ज़ाद, हज़रतुल्लाह, रहमत शाह, हशमातुल्ला शाहिदी, नजीबुल्लाह ज़ादरान, मोहम्मद नबी, गुल्बदिन नाएब, राशिद ख़ान, दौलत ज़ादरान, मुजीब उर रहमान, हामिद हसन
ऑस्ट्रेलिया संघ –
ऐरन फ़िंच, डेविड वार्नर, उस्मान ख्वाजा, स्टिव्हन स्मिथ, ग्लेन मैक्सवेल, मार्कस स्टोइनिस, एलेक्स कैरी, नाथन कूल्टर-नाइल, पैट कमिन्स, मिचेल स्टार्क, एडम ज़म्पा