लीड्स – शाहीन आफ्रिदी, वहाब रियाझ यांच्या प्रभावी माऱ्यासमोर अफगाणिस्तानचा संघ अवघ्या 227 धावांवर आटोपला आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार गुलाबदिन नईब याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघास 50 षटकांत 9 बाद 227 पर्यंत मजल मारता आली आहे.
#CWC19 Afghanistan finishes at 227/9 in 50 overs against Pakistan at Headingley, Leeds. #AFGvPAK pic.twitter.com/vi3cf1J4hK
— ANI (@ANI) June 29, 2019
अफगाणिस्तानकडून फलंदाजीत असगर अफगान आणि नजीबुल्लाह जादरान यांनी प्रत्येकी 42 धावा केल्या. याशिवाय सलामीवीर रहमत शाह याने 35 धावा केल्या. पाकिस्तानकडून गोलंदाजीत शाहीन आफ्रिदीने 10 षटकांत 47 धावा देत सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर वहाब रियाज आणि इमाद वसीम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.