#CWC19 : म्हणूनच मी दुखापत लपविली होती – हश्मतुल्लाह शाहिदी

मॅंचेस्टर – इंग्लंडचा मार्क वुड याचा चेंडू माझ्या हेल्मेटवर जोरात बसल्यामुळे त्याला तडाही गेला. मात्र आई काळजी करीत बसेल म्हणून मी दुखापत लपविली. तसेच महत्वाच्या क्षणी माझ्या सहकाऱ्यांना सोडण्याबाबत माझे मन तयार नव्हते व मी फलंदाजी सुरू ठेवली,असे अफगाणिस्तानच्या हश्मतुल्लाह शाहिदी म्हणाला.

हश्मतुल्लाह शाहिदी याने या सामन्यात 76 धावा केल्या. त्यामुळेच त्यांच्या संघास पन्नास षटके खेळता आली. शाहिनी हा 24 धावांवर असताना वुड याच्या चेंडूने त्याच्या हेल्मेटलाच लक्ष्य केले. शाहिदी जमिनीवर कोसळला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नियुक्त केलेले वैद्यकीय तद्य त्वरीत मैदानावर आले. त्यांच्यासोबत अफगाणिस्तानच्या व्यबस्थापक व फिजिओंनीही धाव घेतली. शाहिदी याला पॅव्हेलीयनमध्ये येण्याचाही त्यांनी सल्ला दिला. तथापि त्याने दुखापतीकडे दुर्लक्ष करीत मैदान सोडले नाही.

शाहिदी याने सांगितले की, मी जर दुखापतीमुळे मैदान सोडले असते, तर माझ्या आईला खूप काळजी वाटली असती. ती धाय मोकलत रडत बसली असती. गतवर्षी माझ्या वडिलांचे निधन झाल्यामुळे ती सतत दुखा:च्या छायेत असते. तिला आणखी मानसिक धक्का बसू नये म्हणूनच मी बाद होईपर्यंत खेळत बसलो. माझा मोठा भाऊ येथे आला आहे. माझ्या दुखापतीची त्यालाही खूप काळजी पडली असती म्हणून त्यालाही दुखापतीबाबत बोललो नाही. सामना संपल्यानंतर आयसीसीच्या वैद्यकीय तद्यांची भेट घेतली. त्यांनी माझी बारकाईने तपासणी केली व त्यांनी मला मुका मार बसल्याचे सांगितले. त्यांनी वेदनाशमन गोळ्याही दिल्या. त्यामुळे मी बरा आहे.

अफगाणिस्तानचे फिजिओ नवीन सायेह यांनी सांगितले की, चेंडू लागल्यानंतर आयसीसीच्या वैद्यकीय तद्यांनी शाहिदी याला तंबूत विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता. तथापि त्याने हा सल्ला मानला नाही व खेळत राहण्याचा निर्णय घेतला. त्याच्या डोक्‍यावर लागले असाबे हे मला कळत होते पण शाहिनी हा अतिशय हट्टी आहे. त्याच्यापुढे कोणाचेच चालत नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)