अफगाणिस्तान, 90 दहशतवादी ठार

पाटकिका (अफगाणिस्तान): अमेरिका आणि अफगाणिस्तानच्या फौजांनी आज दहशतवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई केली. अफगाणिस्तानच्या दक्षिण पूर्वेकडील वर्मामा जिल्ह्यातल्या पाटकिका भागात केलेल्या या धडक कारवाईदरम्यान 110 तालिबानी दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात झाले. या कारवाईत 90 दहशतवादी ठार तर 20 जखमी झाले आहेत. अमेरिकेच्या फौजांनी केलेल्या हवाई सहाय्याच्या आधारे अफगाणी फौजांनी ही कारवाई केली.

अफगाणी फौजांच्या प्रवक्‍त्याने या कारवाईबाबतची माहिती प्रसिद्धी माध्यमांना दिली. या कारवाई दरम्यान अफगाण फौजांनी दहशतवाद्यांच्या 23 मोटरसायकली, ट्रॅक्‍टर आणि काही शस्त्रास्त्रेही नष्ट केली, असे या प्रवक्‍त्याने सांगितले.

दरम्यान अफगाणिस्तानमध्ये “रेड क्रॉस’या आंतरराष्ट्रीय संघटनेवर घातलेली बंदी तालिबानने आज उठवली. मानवतावादी दृष्टीकोनातून मदतकार्य करण्याला “रेड क्रॉस’ला परवानगी देण्यात आली आहे, असे तालिबानी प्रवक्‍त्याने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.