अफगाणिस्तानातील हाजरा समुदाय होत आहे लक्ष्य

काबुल – अफगाणिस्तानातील पश्‍चिम काबुलमधील हाजरा समुदायाला दहशतवाद्यांकडून सर्रास लक्ष्य केले जाउ लागले आहे. गेल्या आठवड्यात एकाच कुटुंबातील लहान भावाबहिणींना बॉम्बस्फोटांनी उडवून देण्यात आले. काबूलच्या दश-ए-बार्ची जिल्ह्यात दोन दिवसांच्या कालावधीमध्या झालेल्या स्फोटात एकूण 18 लोक ठार झाले.

अफगाणिस्तानातिल अल्पसंख्य हाजरा समुदायाविरोधा तो अलिकडच्या काळात झालेला हा सर्वात भीषण हल्ला मानला जातो आहे. अमेरिकेच्या फौजा माघारी गेल्यानंतर यापेक्षाही भीषण हल्ले केले जातील अशी भीती हाजरा समुदायाकडून व्यक्त केली जाते आहे.

अफगाणिस्तानच्या एकूण 36 दशलक्ष लोकसंख्येमध्ये हाजरा समुदायाचे प्रमाण केवळ 9 टक्के आहे. बहुसंख्य ताजिक, उझ्बेक आणि पश्‍तून वंशियांपेक्षा त्यांच्या वांशिक भिन्नतेमुळे त्यांना वारंवार लक्ष्य केले जाते आहे. बहुसंख्य हाजरा हे शिया वंशिय असतात. कट्टरवादी सुन्नींच्या इस्लामिक स्टेटकडून या समाजाला तुच्छ लेखले जाते.

20 वर्षांपूर्वी तालिबानचा नाश झाल्यानंतर हाजरांनी अफगाणिस्तानात नव्या लोकशाहीची आशा धरली होती. शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रात त्यांनी त्यांची प्रगती करण्यास सुरुवात केली होती. आता हाजरा समाजानेही प्रतिकार करायला सुरूवात केली आहे. सरकार हजाराची पर्वा करीत नाही आणि त्यांचे संरक्षण करण्यात अयशस्वी ठरले, अशी प्रतिक्रीया या समाजाच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहे.

2015 पासून झालेल्या हल्ल्‌यांमध्ये कमीतकमी 1,200 हाजरा ठार झाले आणि आणखी 2,300 जखमी झाले, अशी माहिती काबुल स्थित मानवाधिकार आणि हिंसाचार विरोधी संघटनेचे कार्यकारी संचालक वडूद पेड्राम यांनी दिली. शाळा, विवाह, मशिदी, स्पोर्टस क्‍लब आणि अगदी जन्माच्या वेळीही हजारांना लक्ष्य केले गेले आहेत. मात्र या हत्याकांडाबाबत संपूर्ण जग काहीच बोलत नसल्याचे हाजरा समाजाचे म्हणणे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.