इस्लामाबाद :– पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीनेवरील ड्युरांड लाईनवर (Durand Line ) पाकिस्तानचे सीमेवरील लष्कर आणि तालिबानी सुरक्षा रक्षकांदरम्यान चकमक झाली आहे. रविवारी संध्याकाळी झालेल्या या नव्या चकमकीमध्ये किमान सात जण जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानच्या पक्तिया प्रांतातील दंद ए पटान भागात ही चकमक घडली. जखमी झालेल्यांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याचे पाकिस्तानातील प्रसार माध्यमांनी म्हटले आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानदरम्यानच्या ड्युरांड लाईनवर अजूनही तणाव आहे. ड्युरांड लाईनवर दोन्ही बाजूंकडून यापूर्वीदेखील सशस्त्र चकमकी झाल्या आहेत. तालिबानींनी केलेल्या गोळीबारात पाक सैनिक ठार झाला असल्याचा दावा तालिबानकडून करण्यात येतो आहे. मात्र पाक लष्कराकडून अद्याप त्या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. जखमींचा नेमका आकडा देखील अद्याप स्पष्ट होऊ सकलेला नाही.
या भागावर पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दोन्ही बाजूंकडून दावा करण्यात आला होता. येथील चकमकींमुळेच पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तालिबानी प्रशासनामध्ये वाद आहेत. तालिबानला ड्युरांड लाईन मान्य नाही.
Indonesia earthquake : इंडोनेशियाला भूकंपाचा जोरदार धक्का, किमान 46 जण ठार
तालिानपूर्वी अफगाणिस्तानमध्ये असलेल्या सरकारांनीही पश्तुन लोकवस्ती असलेला हा भाग अफगाणिस्तानचाच असल्याचा दावा केला होता. गेल्या वर्षी तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर ड्युरांड लाईनबातचा मतभेद पुन्हा उफाळून आला आहे.