पुणे – पुण्याचे प्रभारी प्रमुख जिल्हा सरकारी वकील आणि सरकारी अभियोक्तापदी विद्यमान सरकारी वकील अॅड. एन.डी.पाटील (धायगावे) यांची निवड झाली आहे. राज्याच्य विधी व न्याय विभागाने आजपासून (सोमवार, दि. 2 मार्च) ही नियुक्ती केली. त्यांनी आजच पदभार स्विकारला.
अॅड. पाटील हे ज्येष्ठ सरकारी वकील असून, ते 2003 पासून सलगपणे सरकारी वकील म्हणून कार्यरत आहेत. 1998 पासून वकील म्हणून प्रॅक़्टीस करण्यास सुरूवात केली होती. त्यांचे शिक्षण एम.ए.एल.एल.बी झाले आहे. ते पुणे जिल्ह्यातील स्थानिक रहिवाशी आहेत. निवडीबद्दल वकील वर्ग, कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.