सातारा – सातारा – सातारा जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ऍड. वसंतराव भोसले यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे.
बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या मार्च 2018 मध्ये झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ऍड. भोसले हे सदस्यपदी निवडून आली होते. कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेत त्यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. ऍड. भोसले हे वेळू, ता. कोरेगाव येथील रहिवासी असून त्यांनी विविध न्यायालयांमध्ये 32 वर्षे दिवाणी व फौजदारी क्षेत्रात काम केले आहे. जिल्हा न्यायालयातील वकील संघटनेमध्ये त्यांनी सदस्य, उपाध्यक्ष, अध्यक्ष अशा पदांवर काम केले आहे.