पुणे – महापालिकेच्या अधिकारी आणि सेवकांना लागू झालेल्या सातवा वेतनासंबंधी प्रशासकीय कामे करण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली सल्लागार समितीची नेमणूक करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अधिकारी आणि सेवकांना शासनाच्या आदेशानुसार, 1 जानेवारीपासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. महापालिकेत शेड्युलमान्य 23 हजार 708 पदे असून त्यापैकी 16 हजार 139 अधिकारी व कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. यामुळे वेतनामध्ये अंदाजे 10 ते 20 टक्के वाढ होणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात 45 कोटींची तरतूद आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासकीय स्तरावरील कामे होण्यासाठी
9 सदस्यीय सल्लागार समिती गठीत केली आहे. ही समिती पालिका अतिरिक्त आयुक्त (ज) यांच्या अध्यक्षतेखाली असून, त्यात मुख्य कामगार अधिकारी सचिव तर उपायुक्त (सामान्य प्रशासन), मुख्यलेखा आणि वित्त अधिकारी, वैद्यकिय संवर्गातील अनुभवी अधिकारी, प्रशासकीय संवर्गातील अनुभवी अधिकारी, अभियांत्रिकी संवर्गातील अनुभवी अधिकारी, पालिका कामगार युनियनच्या सरचिटणीस मुक्ता मनोहर, पीएमसी एम्प्लॉईज युनियनचे सरचिटणीस चंद्रकांत शितोळे आदींचा सदस्य म्हणून समावेश आहे.