पुणे (प्रतिनिधी) – बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने केलेल्या मागणीनुसार वकिलांना तातडीने करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्याची मागणी ॲड. मंगेश लेंडघर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
ईमेलद्वारे ही मागणी करण्यात आली आहे. ॲड. लेंडघर यांनी राज्यातील वकिलांना १०० कोटी रुपये देण्याची मागणी यापूर्वी मुखमंत्र्याकडे केली आहे.
कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. अनिल गोवरदिपे यांनी १० मे रोजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे वकिलांना तातडीने लस देण्याविषयी पत्र दिले आहे. या पार्श्वभूमीवर ॲड. लेंडघर यांनी ही मागणी केली आहे.
वकील हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम वकील करतात. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात वकिलांनी मोठे योगदान दिले आहे. याचा विचार करून वकिलांना प्राधान्याने लस मिळवून देण्याची मागणी ॲड. लेंडघर यांनी मुखमंत्र्याकडे केली आहे.