जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशासाठी जाहिरातबाजी

पळसदेव – जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इंदापूर तालुक्‍यात प्रथमच जिल्हा परिषद शाळेत प्रवेशासाठी जाहिरातबाजी करण्यात येत आहे. ही शाळा पळसदेव येथील बंडेवाडीची आहे. शाळेने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. शाळेत गेल्यावर्षी राबवलेले विविध उपक्रम व शाळेची प्रगती याबाबत बॅनर प्रसिद्ध करून गावातील मुख्य चौकात लावला आहे. अनेक विद्यार्थी गावात शाळा असताना बंडेवाडी वस्तीवरच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. सोमवार (दि.17) पासून शाळा सुरू होणार आहे. वाड्या वस्त्यावरील शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्येची समस्या बनली आहे.

मात्र, शाळेने जाहिरातबाजी करून मुलांना प्रवेश देत आहे. हा चर्चेचा विषय झाला आहे. शिक्षक संतोष हेगडे म्हणाले की, 7 मुलांचा प्रवेश निश्‍चित झाला आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश बांडे व सभासद नवनवीन उपक्रम राबवत आहेत. इतरही शाळांनी बंडेवाडी शाळेचा आदर्श घ्यावा, अशी प्रतिक्रिया पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब काळे यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.